STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Others

3  

swati Balurkar " sakhi "

Others

चुकीची वेळ

चुकीची वेळ

1 min
258

डोळ्यातले अश्रु सांगतात

काय होतं,नातं तुझं माझं 

दूर गेलास तर आठवायचं नाही

असं ठरलं नव्हतं , तुझं माझं !


ठरलेल्या गोष्टी तू मात्र 

पाळल्यास कटाक्षाने,

मी मात्र कोलमडले

नसलेल्या तुझ्या विचाराने!


माझ्या डोळ्यात अश्रु येतात

अगदी तुझ्या आठवणीनेही !

तू मात्र निर्विकार , तटस्थ होतास

प्रत्यक्ष माझ्या दर्शनानेही!


झाला तो भाग्याचा खेळच होता,

चूक कुणाची? फक्त नशीबाची होती!

आयुष्य हा आठवणींचा मेळच होता 

आपण भेटलो ती वेळच चुकीची होती!


Rate this content
Log in