चरित्र सौंदर्य...!
चरित्र सौंदर्य...!
1 min
188
आपल्यासाठी आपलं अथवा दुसऱ्याचं
कोणतं सौंदर्य का म्हणून महत्वाचं
ते आपण आपलं असतं ठरवावं
कुणी कितीही गाथा गायली
कधी ब्रह्मज्ञानही आवर्जून सांगितलं
तरीही आपल्या विचारांचं योग्य-अयोग्य असणं
शेवटी आपल्या मनाला लवकर पटतं
म्हणून कुणाचंच ऐकू नये असं मुळीच नाही
निर्णय घेण्याची योग्यता प्रत्येकात असते
ती फक्त आपण वेळीच ओळखावी
आपला कोणता गुण कुठे कसा
नि केव्हा वापरावा पारखावा
याचं ज्ञानही यातूनच मिळतं
'चरित्र' नावाचा पवित्र सौंदर्य ग्रंथ
याच विचारांतून घडतो, फुलतो....!!!
