चंद्र प्रकाश
चंद्र प्रकाश

1 min

307
बेरंग होत चाललेल्या आयुष्याचा
अलवार विरस पडतो..!!
जेव्हा काळ्या नभात
चंद्र प्रकाश सांडतो..!!
मंद मधूर आभाळाला
साज चांदण्याचा शोभतो..!!
प्रेम चंद्राचे पाहण्याचा
सुखद क्षण लाभतो..!!
सडा पडतो स्वप्नाचा
नितळ खोल अंबरी..!!
वाटते सजवून घ्यावे स्वप्न
मन कोमजण्या परी..!!
तो संथ खेळ चालतो
अलवार तारांगणी..!!
शब्द थिरकतो काव्याचा
सहज माझ्या अंगणी..!!