चंद्र माझा तू
चंद्र माझा तू
1 min
209
खिडकीतून रोज डोकावणारा,
तो चंद्र आज कुठे रे हरवला,
तुझ्या आठवणींना रंगवणारा,
आज का बरं तो रुसून बसला...
त्याच चांदणं चिंब चिंब भिजवतं,
तुझ्या असण्याचा आभास देतं..
तुझ्या सारखा तो ही तेजस्वी रुपी,
त्याचं तेज माझं मन प्रकाशमय करतं..
तुझ्या सारखा.... तो ही अल्लड ,
त्यालाही मला ढगा आड लुपून पाहायला आवडतं..
इतका दूर तू माझ्यापासून आहेस तरी,
त्याला पाहून मला तुला पाहता येतं...
आज तुही तिथे रुसला आहेस का माझ्यावर?
म्हणुन त्याला सांगितलं,आज नको जावू..
अरे...! त्याला पाहूनच तर तू रोज मला भेटतो,
असं दूर जाऊन नको ना मला तू रडवू...
