चमत्कृती
चमत्कृती
अमूल्य वदले स्मित जणू,
उमटले कुसुमांवर
हिरवा हिरवा गार सुगंध,
दरवळला तृणांवर
अभीर रंग ह्या नभात दाटून,
उधळतो क्षितिजावर
सप्तसुरांचे प्रयोग आगळे,
क्षणकलीकांचे गायन
रंजन चेतनेचे उत्फुर्त,
घडतोय नृत्याविष्कार
दिव्य गर्भ वसुंधरेचा जातो,
अनुराग मग रंगवून
अविरत प्रदक्षिणेस आतुर,
अनादी नारायण
अगणित दाटीने रोमांच सारे,
चमत्कृतीने नाहले
अंतरीच्या भ्रमात ह्या,
शब्द शब्द गुंजले...
शब्द शब्द गुंजले...
