STORYMIRROR

yuvaraj jagtap

Others

4  

yuvaraj jagtap

Others

"चल शाळेला चल रे बाळा"(बालगीत)

"चल शाळेला चल रे बाळा"(बालगीत)

1 min
43.1K


चल शाळेला चल रे बाळा

माझ्या तान्हुल्या शिक रे शाळा


चल शासन देतय रे पुस्तकं नवी

लेकरांनी शाळा शिकाया हवी


चल पाठीवर लिहू रे उजळणी

सोबतीला आहेत मित्र मैत्रिणी


चल गुरुजींची हाय रे गोड वाणी

शिक्षका मागून गाऊ आपण गाणी


चल बराखडीची करू रे घोकंपट्टी

तवर होतेय मधली सुट्टी


चल शाळेत रोज रे खिचडी भात

आपण बसू रे ओळीने खात


चल हातात घेऊ रे झाडू

खिचडी चे खरकटे काढू


चल वाजली रे दुपारची घंटा

मधल्या सुट्टीत कराया नको तंटा


चल दुपारी लिहू रे ए बी सी डी

इंग्रजीची लावून घेवू गोडी


चल शेवटचा आला रे खेळायचा तास

खेळू लंगडी फुगडी झिम्मा खास


Rate this content
Log in