Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

yuvaraj jagtap

Others

4  

yuvaraj jagtap

Others

चिऊताई

चिऊताई

1 min
20.6K


चिऊताई ची चिव चिव

कानी आमच्या पडेना

भुर्रकन डोळ्यासमोर

चिऊताई तू उडेना


चिऊताईचा वावर

अंगणी आमच्या दिसेना

पूर्वी सारखी सकाळ

थोडीही हसेना


चिऊ अंघोळीची मजा

पाहायला तुझी मिळेना

तुजसाठी काय करावे

आम्हाला कळेना


चिऊताई अंगणात यायला

लावू नकोस तू नाट

डोळे तुझ्या येण्याकडे

अन भिंतीकडे माझी पाट


चिऊताई ज्वारीचे दाणे

बघतात तुझी वाट

चोचीत ते टिपताना

पहावा वाटतो तुझा थाट


चिऊताई निसर्गात

चित्रा पुरती नकोस उरु

तुझ्या अस्तित्वासाठी

आमचा ठेवू लढा सुरू


Rate this content
Log in