चिऊताई चिऊताई
चिऊताई चिऊताई
1 min
164
चिव चिव चिमणी चिऊताई
गोड गोड गावूनी गाणी
उंच आकाशी झेप घेई
पिल्लांसाठी दाणा पाणी
चिव चिव चिमणी चिऊताई
चिमण पाखरांची तुच राणी
रानी वनी दूरदूर जाई
घरट्यासाठी काड्या आणी
चिव चिव चिमणी चिऊताई
येगं राणी माझ्या अंगणी
झाडे लावली पाखरां साठी
नको जाऊ दूरवर गगनी
चिव चिव चिमणी चिऊताई
चिमणा चिमणी राघो मैना
सदैव नांदो सुखात वाढो
नको करू गं आमची दैना
चिव चिव चिमणी चिऊताई
चिऊताई ला भेटण्याची मलाच घाई
