चित्तचोर
चित्तचोर
1 min
258
स्वप्नात मी रंगून गेले
प्रीतीत तुझ्या दंगुन गेले
मन माझे बहरुन गेले
तुझ्यात मी गुंतून गेले .
चेहऱ्यावरील रुळणाऱ्या बटांना
गालावरील तुझ्या खळींना
नयनात पापण्या उडतांना
हरवून गेलो तुला पाहतांना.
मन माझे खट्याळ व्हावे
अलगद तुझ्या मनी विसावे
गालात गोड तुझ्या हसावे
प्रेमात चिंब- चिंब भिजावे.
ना आवरता मोह प्रीतीचा
झुळूक होवून मी वाऱ्याचा
स्पर्शून चेहरा तुझा मोत्याचा
चित्तचोर मी तुझ्या हृदयाचा.
