STORYMIRROR

Rajendra Bansod

Children Stories

3  

Rajendra Bansod

Children Stories

चिंब धारा श्रावणातील

चिंब धारा श्रावणातील

1 min
170


श्रावणाच्या चिंब धारा

बरसुनी गंधित केलं आज

सरी गाती बरसुनी, रूप न्यारा

सृष्टी सजली, लेवूनी हिरवा साज|१|


नटली बागे, फुलली फुले

रानीवनी पक्षी, प्राणी घुमती गाताना

आनंद डोही बागडती मुले

होडी घेऊनी, भिजती धुंद नाचताना|२|


हर्षित गंधित मंद धारा

बागा फुलवी शेतमळ्यांना

धो-धो बरसत गाती धारा

दुथडी भरुनी नाले, मिळती नद्यांना|३|


नवचैतन्य या जीर्ण जीवांचे

श्रावणाने कसे बहरूनी गेले

स्वप्न उरातील गर्द नैराश्य

श्रावणमासी हर्षित न्हाले|४|


Rate this content
Log in