चिमुकली
चिमुकली
1 min
328
मायेत सजवल्या
स्वप्नांच्या झुंबरावळी
भासे मृगजळ परी
ती मोहक कळी....
दीपक चालवी
अखंड वंशावळ
ती एकच दीपमाळ
जोडी दोन घरांची नाळ....
ती माया ममता
वात्सल्याचे रूप
बहीण ,पत्नी ,आई
वठवी भूमिका खूप....
हृदयी नित्य वाहे
अमृतरुपी झरा
ती असता जवळी
न येई तीमिर वारा....
जन्म लक्ष्मीचा
ईश्वरी वरदान
पदरी उंचावेल
जन्मदात्याची मान....
आठवा भूतकाळ
स्त्री नाही परिहास
घडवेल आजही
नवा कणखर इतिहास....
मानव करिसी
शक्ती पूजेचा मानस
न करी तिच्या
अधिकाराचा उपहास....
संवेदनाहीन समाजास
एकच असे मागणे
अनुभवू द्या तिलाही
फुलांचे जगणे....
