चिमणी दिवस
चिमणी दिवस
1 min
199
एक घास चिऊचा एक घास काऊचा असं म्हणण्यासाठी
आता चिऊच नाही राहिली रे
त्या चिऊविना आपुला काऊदेखील कासावीस रे
काऊतरी बघ की आता राहिले आहेत कितीसे रे
शेणाचे घर कावळ्याचे कधीच वाहून गेले रे
मेणाचे घर चिमणीचे चिऊ विना रिकामेच रे
सांगाल गोष्टी चिमुकल्यांना पण दाखवणार चिऊ कशी रे
पुस्तकातील चित्रांनी बाळे खूष होतील का रे
आज आली वेळ आपल्यावर चिमणी दिन साजरा करण्याची
आपल्याच या ग्लोबलमुळे चिमणी आपल्यावर हिरमुसली
