STORYMIRROR

शिवांगी पाटणकर

Others

4  

शिवांगी पाटणकर

Others

छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराज

1 min
1.1K

पुरंदरी जन्मला तेजस्वी सुर्य

ज्याच्यात पराक्रम धैर्य अन् शौर्य


रुद्राचा तो अवतार जाहला

संपविण्या त्या औरंग्याला


जशी नजर धारदार

तशी तळपते तलवार


नाही पाहिला पराजय कधी 

ना घेतली माघार कधी  


ज्याच्या समोर मृत्यू ही नतमस्तक जाहला

स्वराज्यास ऐसा छत्रपती लाभला


धर्म पंडित विद्वान असे हा राजा

ज्याच्या न्यायानं सुखावली प्रजा


स्वधर्म अन् स्वराज्य रक्षणार्थ लढला

ऐसा शिवबाचा छावा शंभू राजा झाला


Rate this content
Log in