छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज
आलं होतं महाराष्ट्रावर औरंगजेबरुपी संकट जेव्हा
वाचविण्यासाठी महाराष्ट्र शिवशंभू अवतरले तेव्हा
शिवाई देवीच्या आशीर्वादाने शिवनेरीवर शिवबा जन्मला
अन् आई भवानी अन् जिजाऊच्या आशिर्वादानं मराठ्यांचा तो राजा झाला
स्वराज्यनिष्ठेची रोहिडेश्वरासमोर शिवरायांनी शपथ घेऊनी
लढले ते सर्व धर्म, पंथ, जातीच्या माणसांना सोबत घेऊनी
करण्यासाठी साऱ्या शत्रूंचे उच्चाटन
केले शिवरायांनी मावळ्यांचे संघटन
अन्याय-अत्याचारातून सुटका केली जनतेची
अन् मनं जिंकली त्यांनी साऱ्या गरीब प्रजेची
दिला त्यांनी परस्त्रीला आईचा मान
अन् वाढवली मराठी अस्मितेची शान
पराक्रमी असा हा सिंहाचा छावा
लढले ते साऱ्यांशी करूनी गनिमी कावा
बांधिले सिंधुदुर्ग करण्या स्वराज्याचे संरक्षण
केली त्यांनी आरमाराची स्थापना घालूनी दर्याला वेसन
पराक्रमी, ध्येयवादी, मुत्सद्दी, धाडसी असा हा राजा
छत्रपतींच्या न्यायानं सुखावली सारी प्रजा
झाले दख्खनच्या या भूमीवरती अनेक पराक्रमी राजे
पण माझ्या शिवाजी महाराजांचे नाव साऱ्या जगात गाजे
