STORYMIRROR

Anup Salgaonkar

Others

4  

Anup Salgaonkar

Others

छपाक - अॅसिड अॅटॅक

छपाक - अॅसिड अॅटॅक

1 min
97

अॅसिड फेकलेस तू या चेहऱ्यावर

ज्यावर हक्क तुझा नव्हताच कधी


विव्हळले रे मी खूप

जखमा या झाल्यात अती


भुवया ह्या पुसून गेल्या

एका डोळ्यात नाहीच त्राण


त्वचेचीच ठिगळं सारी

कुठेय नाक? कुठेय कान?


अनोळखी भासती स्वकीय

तुटत चालली नाती माझी


आरसा पाहता जाणवत राहतं

ओळखंच पुसलीस तू माझी


भीती वाटते प्रत्येकाची

हा एकटेपणा सरणार नाही


राहून राहून वाटत राहतं

मी काही आता मरणार नाही


ओळखते मी असा पक्षी

मरणयातना ज्याने भोगल्या


दिवसामागून दिवस जाता

नवचेतना या जागल्या


जो ठेचून घेतो आपलीच चोच

ओरबाडून काढतो पिसे सारी


अज्ञातवास संपता घेतो

नव्या आयुष्याची गगनभरारी


चेहरा जरी बदलला माझा

कणखर मन बदलणार नाही


धैर्य धीराने आत्मविश्वासाने

पेटून उठेन पण जळणार नाही


लढणे हाच धर्म खरा

जो भीतीलाही वाकवतो


तोच आरसा आहे आज

जो मला नवी ओळख दाखवतो


Rate this content
Log in