STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

3  

Ramkrishna Nagargoje

Others

छंद.

छंद.

1 min
320


छंद माझा ,देई मज आनंद,

पक्षी आणि वने, हरवली भूक,

रान वेल हिरवी,पांढरा मोगरा,

उंच उंच वृक्ष, उंच उंच ढग.


वाहते पाणी, वाहते हवा,

चरते गाय, हिरवा चारा,

किलबिल पक्षी,

झाडावर घरटे,

आनंदें भरले,

रान सारे.


फुलला पिसारा,नाचतो,मोर,

कोकिळा गाते ऋतूचे गाणे,

उंच उंच वृक्षावर,बसली कोठे ?


हरिणाची उडी उंच किती गेली,

पहा पहा,पक्षी फेर्या घेतो,

आकाशी जसा वर्तूळे काढतो.


पावसाची धार ढगाला लागली,

मोत्यांचे थेंब गवतावर पडती,

कोवळ्या उन्हात,मोती चमकती.


रंगांची उधळण आकाशात झाली,

इंद्रधनू बघ, आकाशी आला,

सप्तरंग पाहताना,

किलबिल झाली.




साहित्याला गुण द्या
लॉग इन