छंद प्रीतीचा जडला
छंद प्रीतीचा जडला
1 min
326
तू काळी मी काळा
रंगला आनंदाचा सोहळा
प्रेम प्रीतीचा आपलाही
संसार वेगळा थाटला
रंग काळा या सावरा
थाट किती हा गोजरा
देखावा जसा लाजरा
जणू मोराचा पिसारा
करुणानुबंध मनी हृदयी
ऋणानुबंध असे संस्कारी
एकरुपात मधुर गोडवा
रंगरूपाचा भेद नाहीसा
डोळ्यात चमकता चंद्र
सौंदर्याचा मोह हरला
विश्वासाच्या नात्याचा
छंद आगळा जडला
