छंद बालपणाचे
छंद बालपणाचे
1 min
401
जोपासावे छंद आगळे
बालपणाची ही शिकवण
गोळा करीत शंख-शिंपले
सतत सर्तक क्षणोक्षण
कधी टपाल तिकीट
निरनिराळी फुले पाने
मोरपिसे वा चित्रे रेखाट
स्वतःची आवड जोपासने
छंद ठेवी मनास दक्ष
धंदानवरती सदा कटाक्ष
छंद वहित सारे लक्ष
ही बालपणाची साक्ष
वाचन लेखन व्यक्तीत्व विकास
जगभ्रमंती जाणून घ्यावे व्यास
देशांचे चलन सांभाळावे खास
देशातील संस्कृतीचा अभ्यास
छंद घडवतात बाल मनास
लक्षकेंद्रितता, सहनशिलता
चाणाक्ष नजर स्वतःशी स्पर्धा
बालपणापासून जोपासावी क्षमता
