छेडून गेला सतारी
छेडून गेला सतारी
1 min
429
तुझा स्पर्श छेडून गेला सतारी
नको वेदनेची उद्याला उभारी
एकटी तरी ही सर्वत्र वर्दळ
राहिले फक्त काटे जिव्हारी..
हृदय मी वाहिले तुला
सोडून आले गोतावळा
कधी येशिल रे सख्या
शल्य किती देशिल मला..
मनापासून मनापर्यंत प्रवास
अव्याहत असतोय साथ
संसारात केला मी तप त्याग
करू नकोस रे माझा घात..
तुझ्या प्रतिकाराने माझी
होतेया काळजात धडधड
लक्ष कामात लागत नाही
नुसतीच जीवाची तडफड
