STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

3  

Arun V Deshpande

Others

छान दिवस ते सारे

छान दिवस ते सारे

1 min
411


किती छान ते बालपण

किती छान ती आठवण

आबा झालो जरी आता

नाही विसरलो बालपण

खूप खूप माणसे त्यावेळी

असायची हो घराघरात

पोरं करायची दंग मस्ती

खेळायची मस्त अंगणात

चोर-पोलीस, लपंडाव

शोधा शोध नि धावाधाव

हरेल खेळात जो ,तोच

फेडायचे मग सारे डाव

शाळेत खेळ खेळायचे

हूतूतू, ,खो -खो,फूटबॉल

विटी - दांडू, खेळतांना

मग वेळेचे भान नसायचे

धम्मक लाडू, चापट पोळी,

रंगीबिरंगी लिमलेटची गोळी

मामाच्या गावाला बैलगाडी

काकांच्या गावी झुकझुकगाडी

असे होते ते माझे बालपण

मनात त्याची रोज आठवण-------- ---


साहित्याला गुण द्या
लॉग इन