Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

काव्य रजनी

Others

4  

काव्य रजनी

Others

चहा बिस्कीट

चहा बिस्कीट

2 mins
23.4K


आत्ताच प्यायले बाई मी चहा

नव्हे फक्त चहा जोडीला बिस्कीट

 गरम गरम केला कडक

आले ,लवंग आणि मिरी बेधडक


कसले ते लवंग भारीच चव

काय सांगू त्या मिरीचा स्वाद

साखरेची ती सुरी दुधारी

आले मध्येच नाचे मन मुराद


चहा शिवाय दिस तरी आहेका

लोक का म्हणतात चहा वाईट

अहो चहा शिवाय आहेका 

बिस्कीट चा एक तरी बाईट्ट


चहा सोबतीला बिस्कीट हवे

ट्रे मध्येच सारे सजून यावे

जशी नव वधू पाहण्यास 

पाहुणे सारे घरी हवे


गावच्या चहाची बातच न्यारी

गवती चहा करी मन हे भारी

बिस्किटे सोबती येतात सारी

गणगोत सारे त्यावर ताव मारी


कशी अजब अशी एकमेव जोडी

सगळ्या सुख दुःखात सहभागी

कधी हसणे कधी रडणे ,भांडणे

कितीही झाले तरी ती मध्यभागी


चहा बिस्किटे खाल्ली जेव्हा

प्रत्येकामध्ये आली तरतरी

लहान मुलांना खेळण्या मग

लगेच पटकन येई भरारी


कितीही कामे विस्कटलेली

चहा बिस्किटे पूर्ण करी

कधी ऑफिस चे टेन्शन

चहा ची वाफ त्यांस सावरी


अशी ही चहा बिस्कीट जोडी

सदा बहरत जाओ प्रतिदिन

कधीच न त्याचा लोप पाओ

असेच सोबत असो रात्रंदिन..


माझ्या आईच्या

हाताची गम्मत न्यारी

भांडती आम्ही भावंडे

चहासाठी सारी


चहा कसाही असो

कोरा अन् पांढरा

सूर्याची किरणे ती पडता

दिस उजाडतो खरा


नावरा बायकोच्या 

नात्याला चहाची हो मजा 

कितीही भांडणे झाली

अबोला ही सजा


कधी कधी चहा मध्ये

होतोय हो तोटा

दूध टाकता फुटतो

होतो मोठा तोटा


मला चहा पीला

की येते हो तरतरी

गुळाचा की साखरेचा

त्यात नाही हो तस्करी


पावसाळ्यात छत्रीत 

बसून घेतला का चहा

आभाळ कवेत येते

प्रयोग करून पाहा


थंडगार हवा

त्यात कडक तो चाहा

मज वाटे ढगांमध्ये

चला जाऊन ते पाहा


सासू सून दिवसभर

किती भांडणे करे

शेवटीं चहाच्या कपात

भांडणे मिटती हे खरे


अहो अहो चहा घेता

असे पुसते हो पत्नी

पतिदेव स्मितहास्य

करी छान स्वप्नी


नीळ्याभोर आभाळात

पाखरांचा थवा

चहाचा रंग हो कसा

वाटतो हवा हवा


चहा पिऊ जाऊ चला 

मोकळ्या हवेत

स्वार्थाचा नाश करू

सत्य घेऊ कवेत


माझ्या कविता नी लेख

आहे माझ्या साठी

चहाच्या कपाने त्यांना

बांधले हो पाठी 


चहाची चव कधी

चाखून ती बघा

अंग कसे मोहरते

भरुनी मन जगा


चहा कुणास आवडे

पडले कधी प्रश्न

लहान मुले अन् म्हातारी

माणसे होती तृष्ण


अग एकतेस का

चहा कसा तो होईना

पती राजांना जरा

कळही सोसविना.


आसा कसा चहा

कधी कधी रे रुसतो

सारे जिन्नस टाकले

पहुण्यामध्ये फसतो.


तुझ्या माझ्या चहाची

बातच रे न्यारी

करती निखळ मैत्री

गोड गोड प्यारी


पावसाळा जेव्हा आला

चहा मज उमगला

सप्तरंगच्या इंद्रधनुष्य

कसा तो सजला


माझ्या मनात अबोल भाव

चहाचे ते माझे घर

अनमोल माझा बाळ त्यात

त्याला लागो ना कुणाची न


कसा चहा पीत पित

होते सारे दुःख ठीक

शेतकरी कष्ट करे 

तेव्हा डुलत रे पीक

तेव्हा फुलते रे पीक.......



Rate this content
Log in