STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

चेकअप

चेकअप

1 min
222

तिचं कुंकू सदा अबाधित असावं

 आणि त्याच्यासोबत पूर्ण जिंदगी जगावं

जीवापाड प्रेम करणारी सात्विक पत्नी 

 तिची बाळगून ठेवलेले सुखद स्वप्न

जेंव्हा दुर्लक्षित व अपूर्ण राहतात तेंव्हा 

तिच्या मनाची तगमग होत असते 

ही गोष्ट कुणा दुसऱ्याला कळत नाही ....


आणि मी पणाच्या अहंकारात 

डुबलेला तिचा पती तिचे ऐकत नाही

कोणास आपले म्हणावे तिला

काही ही गोष्ट कळत नाही 

 व्यथा घेवून जीवन जगनं किती असह्य पण

ही गोष्ट कुणा दुसऱ्याला कळत नाही ...


जितकी हौस पुरुषांना आपल्या विवाहाची

 तितकीच हौस आपल्या पत्नीचं 

 ऐकायची सवय कधीच दिसत नाही,

बहुतेक तिची घालमेल व्यर्थच ठरते

 विव्हळत वेदना पचवित जगत असते

ही गोष्ट कुणा दुसऱ्याला कळत नाही...


पतीची तब्येत खालावली तर

 पत्नीला अतिशय चिंता वाटते

 ती आपल्या पतीला वारंवार विणवते 

तो कधीच "चेकअप" करित नाही या सर्व 

गोष्टींनी ती मनोमनी खिन्न होत असते

 पण तिची खिन्नता कोणी समजत नाही 

ही गोष्ट कुणा दुसऱ्याला कळत नाही...


एक दिवस हार्ड अटॅक येऊन पती निघून 

जातो या संसारातून,ती दगडासारखी तटस्थ

एकटी आपले दुःख हृदयात जोपासत असते

भारतीय संस्काराचा मनावर पगडा असतो

कधी दुसर्‍या विवाहाचा विचार देखील 

मनात आणत नाही तेव्हा तिने कसं जगायचं 

ही गोष्ट कुणा दुसऱ्याला कळत नाही...


 ती एकटी पडते एवढ्या मोठ्या दुनियेत 

तिचं कोण असतं अंथाग जन सागरात

 असून सुद्धा कोणीच नसतं 

मुलं असलेली एकट्या बाईने कशी

किंवा तिला नसतिल मुले तर कसे जगावे

ही गोष्ट कुणा दुसऱ्याला कळत नाही...



Rate this content
Log in