चौदा एप्रिल(14)
चौदा एप्रिल(14)
एकोणिसाव्या दिवसाची सुप्रभात...!
ए कंदरीत सर्व जाणती आता
को ठे कोण काय काय करतो
आ णि क कसे कसे संकटाशी
सा वधपणे सामोरे जातो....
व्या धी ही असली महान
दि व्य पछाडले असून सान
व गळूनी सारा पाहुणचार
सा रले दूर ठेवून विवेक साचार.....
चि खल फेक जरी झाली
सु रवातीस ती अज्ञानाने
प्र यत्न चालूच राहिले
भा ग्य खुलविण्या सज्ञानाने
त टस्थ राहुनी पाहतो तो
उगवता तेजोमय रविराज
म्हणे चिंतेस नसे रे काज
चढेल रे आरोग्याचा पुन्हा साज....
फक्त इतुकेच कर राजा
राहुनी आनंदी घरात
येऊ नको पाहण्यासही मज
उठल्या उठल्या रे दारात.....
संकट मुक्त करण्या तुला रे
विषाणू उष्णतेने माझ्या जाळीन
नियम आरोग्यासाठी सृष्टीचा
कसोशीने मी ही पाळीन.....!
