चैतन्याच्या बहराने
चैतन्याच्या बहराने
1 min
315
चैतन्याच्या बहराने,
ओशाळली मरगळ,
आनंदाचे परिमाण,
सुख संवाद निखळ. १
जीव हलका हलका,
स्वप्ने ही नजरेतली,
उत्साहाला उधाणता,
जीवसृष्टी भारावली. २.
नवी पालवी सुखाची,
आगमन वसंताचे,
पानगळ ओघळून,
तरारणे स्वागताचे. ३.
बहरल्या तरुवेली,
पशुपक्षी आनंदले,
शांत पाणी सरितेचे,
झुळुझुळु प्रवाहले. ४.
ओसंडूनी भावफुले,
प्रेममय सृष्टी भासे,
आम्रतरू कोकिळेच्या,
गुंज आलापाने हासे. ५.
