चाराक्षरी काव्य
चाराक्षरी काव्य
1 min
956
सुख हवे
सर्वांनाच
दुःख नको
कुणालाच.
जन्म मृत्यू
आयुष्याचे
सत्य असे
जगण्याचे.
सत्कर्म ते
करा सदा
कुकर्म ते
नको कदा.
द्वेष कुणा
नका करू
प्रेम सदा
मनी धरू.
बरी नव्हे
वृत्ती स्वार्थी
सदा बरी
ती निःस्वार्थ.
श्रीमंतांची
अडल्यांना
मदत ती
गरीबांना.
