STORYMIRROR

Kirti Borkar

Others

4  

Kirti Borkar

Others

चार भिंतीच्या पलीकडे

चार भिंतीच्या पलीकडे

1 min
517

चार भिंतीच्या पलीकडे

किती सुंदर जग आहे

दाराबाहेर पडून आता

बघायचं आहे थोडं मला


कोंडून पडली मी एकटी

गुदमरल्या सारखी रे

थोडं बाहेर निघून मला

जीवन जगण्यास शिकू दे


घरात राहून तीच कामे

करून होते मी उदास

बाहेरच्या सहवासात बघून

रमू दे मला थोडं आताच


चार भितींच्या आता 

राहून होत नाही आता

जग बदलाय सगळं

तू का बदलत नाही थोडा


विचारांच्या पलीकडे तू

माझा विचार कर ना

मलासुद्धा थोडं आता

बाहेर निघून बघू दे ना...


Rate this content
Log in