Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dattatraygir Gosavi

Others

3  

Dattatraygir Gosavi

Others

चार भावंडे

चार भावंडे

1 min
187


मी पणाच व्हावा खुजा

म्हणुनी घ्यावी निवृत्ती

निवृत्ती शिवाय ज्ञानी 

जगता कुणी नाही।।


कोरस:जगता कुणी नाही

     म्हणुनी आले निवृत्ती(२)


म्हणा निवृत्ती, ज्ञाना

सोपान, सान मुक्ताई ।।धृ।।

ज्ञान मिळविण्या केले

ज्ञाना जीवन अर्पण

ज्ञाना ज्ञाना ते पावले

ज्ञानेश्वर माऊली।।


कोरस: माऊलीचे आशिर्वादा

     कसे होऊ उतराई(२)।।१।।म्हणा.....


कठीणातुनी कठीण

सहज ज्ञान मानवा

हा सोपी सापा हिशेब

आले धाकटे सोपान।।


कोरस: आले सोपान म्हणुनी

      ज्ञान ठरले ईश्वर(२)।।२।।म्हणा....

     

निवृत्तीपाठी ज्ञानेश

ज्ञानेशासाठी सोपान

अवघे सोपे जीवन

आता मुक्ताई करी।।


कोरस:मुक्ताईने मुक्त केले

     जीवनी या मोद भले(२)।।३।।म्हणा..।

      

ज्ञान या सोप्या मार्गे

निवृत्ती लाभली स्वर्गे

मुक्ती अटळ या दुर्गे

मन अवस्था ठरे।।


कोरस:अवस्था ठरे म्हणुनी

ज्ञाना केला नमस्कार(२)।।४।।म्हणा...


Rate this content
Log in