STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

चाफा

चाफा

1 min
355

निसर्गाची सारी किमया

फुले पाने सुगंधी छान

वृक्षावरी डोलतात फुले

सर्व कार्यात यांना मान....


फुलांचे मोहक सुवास

मनात निवास करतात

फुलांचे सुरेख झुलणे 

नयनाचे पारणे फेडतात....


पावसाळा अन हिवाळा

गर्दी होते सर्वच फुलांची

चढाओढ लागते यांच्यात

सुगंधाच्या मस्त वर्षावाची....


ज्यावेळी सर्व सुगंध

उन्हात संपून जातो

यावेळी चाफा मात्र

नेमका अमाप बहरतो....


वृक्ष मोठे ,डेरेदार छान

पानोपानी चाफा फुलतो

पानाआड जरी लपला 

तरी सुगंधाने पसरतो....


सोनसळी देखणी फुले

वेड लावतात या जीवाला

चाफ्याचं फूल माळले केसात

मैत्रिणींचा ताफा लगेच भाळला....


साहित्याला गुण द्या
लॉग इन