चाफा
चाफा
1 min
236
चाफ्याचे झाड होते माझ्या अंगणात
त्याला लागायची पिवळसर फुले
रोज सकाळी असे एकच काम
फुलांसाठी जमा व्हायची मुले
पांढरट पिवळसर असलेली फुले
साऱ्या मुलांचे लक्ष वेधून घ्यायची
एक मुलगा त्या झाडावर चढून
एक एक फुल तोडून खाली फेकायची
झाडाखाली असायची बरीच मुले
ज्यांना मिळाली ते टोपलीत भरे
सारी फुले जायची देवाच्या मंदिरात
उरलेले कानावर लावून मिरवी सारे
चाफ्याचे झाड असायचे नाजूक
फारच हळुवार चढावे लागते
फांद्यावर जरा जोर पडला की
लगेच ती फांदी तुटून जाते
पावसाळा, हिवाळा वा असो उन्हाळा
या झाडाला लागतात बारमाही फुले
रोज सायंकाळच्या वेळी उमलतात
सकाळी फुलांना पाहून मन खुले
