चांदण्यांचा पाऊस..!
चांदण्यांचा पाऊस..!
चांदण्यांचा पाऊस पडताना
मी प्रत्यक्ष पाहिलं
त्याच क्षणी मी पहिलं
काव्य पुष्प वाहिलं
अशी असंख्य काव्य पुष्पे
गुंफून एक काव्यमाला
चंद्राच्या प्रेमा पोटी
मुक्त हस्ते चंद्रास आज अर्पिली
चन्द्र सुद्धा नम्र इतुका की
भाराने खाली झुकला
आणि चांदण्यांच्या सरीसह
तो अलगद खाली आला
इतका खाली आला की
माझा अपमान झाला
कारण त्याने नेमका
एक एप्रिलचाच मुहूर्त गाठला
चिंब भिजताना बरे वाटले
चांदण्यातही तो चंद्र सुखावला
एप्रिल फुल्ल म्हणून
हलकेच जागवून निघून गेला
आजही एक एप्रिलला
तो नियमितपणे चांदण्याच्या
पावसासवे न चुकता येतो
आणि एप्रिल फुल्ल म्हणून जातो....!!