चाळीशीनंतर काय करावं?
चाळीशीनंतर काय करावं?
1 min
350
चाळीशीनंतरचं वाढतं वय
म्हणजे फक्त संख्येचा आकडा
आतला माणूस तोच असणार लाडका
बिनधास्त जगा बिनधास्त रमा
सहचारिणीच्या गप्पात आनंद शोधा
मुला-बाळांचा संसार मजेत बघा
नातवंडांचा घोडा बनून बालपण
पुन्हा एकदा भरभरून आनंदात जगा
नातलगांचा बोलबाला हसून झेला
मित्रमंडळींचा नौटंकी आस्वाद
खळखळून मनसोक्त चाखा
स्वतःसोबतचा प्रत्येक क्षण जपा
निवृत्तीचं वय वगैरे काही नसतं
वृद्धत्वाची सुरुवात जरी चिंतेची तरीही
आतल्या आवाजाला तरुण ठेवायचं
आपल्याला जमेल तसं जगून घायचं
