चालेल
चालेल
1 min
167
कवितांचे भाकड दिवस असतात कधी कधी
प्रसिद्धीचे झोत अंगावर नसतात कधी कधी
शिकायचे आहे असेही जगणे नीरस बेरंग
सगळेच दिवस सारखे नसतात एकरंग
निरुत्साहाच्या लाटा मनाच्या किनाऱ्यावर येताना
भ्रष्ट शब्दांचे फटकारे कधी अंगावर घेताना
नवी कल्पना कधी उत्स्फूर्तपणे सुचतही नाही
दिल्या शब्दांवरून कविता पाडणे पसंत नाही
कोरीव कामाच्या रूक्ष तंत्राच्या आहारी जाऊ नये
गटबाजी चालते जिथे तिथे साहित्य देऊ नये
