STORYMIRROR

Manda Khandare

Others

3  

Manda Khandare

Others

चाले उन सावलीचा खेळ

चाले उन सावलीचा खेळ

1 min
215

चाले उन सावलीचा खेळ

बये माया ग अंगणी

काढा काढा नजर कुणी

माया दाराची ग कुणी


तुळशी माय उभी अंगणी

साक्ष सुखाची जणु देते

उभ्या जनमाचे हिशोब,

बाई जातीले जनु सांगते.


पराटीच कूपन, करी 

रक्षण घरादाराचे

दुःखाचे धागे दोरे

टाके सुकाया त्यावरे.


किल-बिल चाले आंगणी

बाई जसा गोकुळ भासते

कान्हा च्या लोन्या पाई

रई आंगनात लावते.


काळ्या माय चे उपकार

दोन घास देते सुखाचे

आभाळ बी बाप होऊन

समाधानाने बरसते


लक्ष्मी नारायणाचा जोड़ा

म्हणून माय नजर काढ़ते

अंगनातील गाय

तवा हंबरडा फोड़ते


Rate this content
Log in