चाहूल
चाहूल
1 min
465
इच्छा पूर्ण न होताच
हळूच पळून गेली
तुझ्यातुनी दूर जाताना
एकटी होती पडली
तुझी वाट प्रेमाची
बघत आता बसली
विसरून लावील सगळं
शब्द प्रेमातले तुझ्या
मन भरून माझं येते
भूतकाळात माझ्या
बघितले स्वप्न मोठे
झाले न कधी पूर्ण
ठरलेत सगळे खोटे
आयुष्यात माझ्या
तुझ्यासाठी विसरुनी
आली होती तुझ्यात
चाहूल प्रेमाची घेऊनि
येऊन गेली माझ्यात...
