STORYMIRROR

Yogita Takatrao

Others

4  

Yogita Takatrao

Others

चाहूल दिपावलीची

चाहूल दिपावलीची

1 min
377

प्रथम दिन शुभ

आहे धनत्रयोदिशी

धन,ऐश्वर्य,समृद्धी 

वाढे ह्याच दिवशी


द्वितीय दिन शुभ

दिव्यतेच प्रतीक

नरकचतुर्दशी ही

पवित्र स्वस्तिक


तृतीय दिनी शुभ

लक्ष्मी फिरे घरोघरी

देण्या आमावस्येस

सकारात्मक लहरी 


चर्तुथ दिन शुभ 

बलि प्रतिपदा 

अतिवृष्टी नको

वर देई सर्वदा 


पंचम दिन शुभ 

भाऊबीज असे

बंधू भगिनी प्रेम

हृदयी बंध वसे


लक्ष लक्ष ज्योतींनी

वाट प्रकाशाची

आली घेऊन प्रसन्न

चाहूल दिपावलीची



साहित्याला गुण द्या
लॉग इन