चाहूल अशी...
चाहूल अशी...
1 min
73
राग द्वेषाचा राक्षस
मात प्रेमाच्या क्षणात
क्षणोक्षणी किती आतुर
आनंदाच्या या मोहात
लपंडाव विरहाचा
सुखदुःखाच्या रानात
चाहूल अशी लागली
आठवणींच्या वनात
गेले विरून मत्सराचे
सतावणारे घायाळ राक्षस
उरल्या आपल्या कहाण्या
मायाळू प्रेमाच्या देवता
