STORYMIRROR

Urmi Hemashree Gharat

Others

3  

Urmi Hemashree Gharat

Others

चाहुल

चाहुल

1 min
264


मृगाची चाहुल लागता

जीव गुंतला तुझ्यासवे

नभ दाटुन आलेेले

मौनाच्या त्या वाऱ्यासवे


नीलकांती भाळी चमकली

लख्ख चंदेरी बिजली

कुशीत घेऊनी बेधुंद

निशाही रुपेरी निजली


अबोल प्रीत मोहरली

मेघ सोनियाचे नाचता

मनमंदिरात सनई नादावली

भाव तुझ्या मुखाचे वाचता


साहित्याला गुण द्या
लॉग इन