STORYMIRROR

Shila Ambhure

Others

4  

Shila Ambhure

Others

चाहुल

चाहुल

1 min
407

बाळाच्या येण्याची

लागली चाहुल

अंगणी पडेल

सानुले पाऊल


आनंद भरला 

माझ्या गं उरात

सानुले येणार

माझिया दारात


उमलते कळी

जशी लतिकेची

तशीच होणार

आई मी बाळाची


स्वप्न रंगविले

झाले नवमास

तुझ्या येण्याचीच

बाळा आता आस


असो मुलगा वा 

वा कन्या गोजिरी

'आई'हाकेने मी

होईल साजिरी.


Rate this content
Log in