STORYMIRROR

Rajendra Udare

Others

3  

Rajendra Udare

Others

बुजगावणे

बुजगावणे

1 min
226

उभ्या पिकांमध्ये काठ्यांना बांधून

त्याला विजार आणि सदरा घालून


डोक्याच्या जागी मडकंच ठेवती

डोळे नाक तोंड चुण्याने रंगवती


शेतकरी राजाची अजब शक्कल

टाकावू पासून हे तात्पुरते माँडल


पाखरांना माणुस असल्याचे भासे

पिकांस आशा प्रकारे राखीत असे


जगी काही माणसं असे वागतात

भरजरीचे वस्त्रे परिधान करतात


माझं डोकं सुपर असल्याचं सांगे

मला सर्व काही कळतं असं वागे


दुसऱ्याच्या सुख दुःखात न जाणं

माणुसकी जराही लवलेश नसणं


आयुष्यभर स्वतःसाठीच जगणे

जसे हे हिंडते फिरते बुजगावणे


Rate this content
Log in