STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

बुद्धिजीवी....

बुद्धिजीवी....

1 min
420

बुद्धिबळाचा पट पाहुनी

बुद्धीची महती डोकावली

बऱ्याच अनुत्तरित प्रश्नांची

उत्तरं मला सापडली


शेळ्या मेंढयांचं जीण

बळी जाण्यासाठीच असत

जणू पटावरच्या प्याद्यांचं

नशिब वाट्याला आल्याचं दिसत


हत्ती घोडे उंट वजीर

राजा भोवती सारे हाजीर

मरणाचे भय प्याद्याच्या माथी

हे दिमाखात चालतात मंद गती


विजयाचे श्रेय ललाटी

घेऊन मिरवतात सारे पटावर

पटापटा प्यादी मरतात त्यांच्यासाठी

जणू जीणे यांच्या बलीदानावर


जीवनातही असेच घडते

कार्यकर्ते जातात फासावर

जसे शेळी जाते जीवानिशी

खाणारा म्हणती जिला वातड


बंगले इमले मान मरातब

मोठ्या धेंडांची मोठी मिजास

कार्यकर्त्यांच्या नशिबी चटणी भाकर

अन सदैव सुखाचा भाळी नकार


शिकवले मज या बुद्धिबळाने

प्याद्याचे जीणे नको रे बाबा

हवे तर हत्ती घोडा उंट वजीर होऊ

राजा संगे बुध्दीजीवी होऊन मजेत राहू


शेळ्या मेंढयांचे आता जीणे नको

बलिदानाचे आता गोडवे नको

सक्षम बुद्धिजीवी जीवन घडवूया

सुख समाधान शांतीचे खरे

हवे तेच करुनी आनंदी जीवन जगुया....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन