बरसला हा पाऊस चहूकडे
बरसला हा पाऊस चहूकडे
1 min
339
आभाळ गर्द दाटुनी आले
बरसला धरतीवर पाऊस चहूकडे
हरपुनी भान आपले वाटले मना
या पावसात तनमनाने अगदी चिंब भिजावे
झेलुनी थेंब पावसाचे गालावरी बरसावे
बरसला धर्तीवर पाऊस हा चहुकडे
मातीचा गंध पसरला वाटलं हळूच भिजावे
धूंद श्वास घेत दोघांनी मिठीत चिंब भिजावे
हरपुनी भान दोघांनी धुंद या पावसात भिजावे
बरसला धरतीवर पाऊस हा चहुकडे
धुंद गाणे गाऊन एकमेकात मिसळावे
क्षणभर का होईना वय आपले विसरावे
बेधुंद होऊन गाणे गात धुंद व्हावे
बरसला धरतीवर पाऊस हा चहुकडे