STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Others

2  

Ashok Shivram Veer

Others

बरसात आनंदाची...

बरसात आनंदाची...

1 min
57

येता अशी ही झुळूक मंद वाऱ्याची,

चाहूल लागे ती तयाच्या आगमनाची.


प्रतिक्षा वर्षावाची असे चातकाला,

अन ग्रीष्मात तापलेल्या धरनी मातेला.


आले मेघ असे दाटूनी अंबरात,

बरसला असा ढग फाडूनी रानावनात.


आस ती होती ओढे नदी नाल्यांना,

मिळाली तृप्ती ही मानव प्राण्यांना.


सुखावती वृक्ष आणि वल्ली सारी,

खगही मारे आनंदी गगनी भरारी.


डराव डराव करी बेडूक डबक्यातून,

होड्या सोडू लागली मुले परसातून.


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍