बरस तुला जेवढं बरसायच
बरस तुला जेवढं बरसायच

1 min

61
बरस तुला जेवढ बरसायच
करशील हिरवं गार रान
हे मला आनंदाने पाहायचं
बरस तुला जेवढ बरसायच
पण , बंद कर तुझ
बरसून स्वःता सोबत
आई बापा पोरग घेवून जायाच
बरस तुला जेवढ बरसायच
दुष्काळात ओस पडलेल्या
नद्या नाल्यांना मला तुझ्या
सोबत पुन्हा वाहताना पाहायचं
बरस तुला जेवढ बरसायच
पण, बंद कर तुझ
गावात शिरून
घरदार मोडून गुरे ढोरे मारून
संसार उद्ध्वस्त करून
समुद्रा सारख सजायच
बरस तुला जेवढ बरसायच
तुझ्या बरसण्याला पाहुन
आम्हाला मनसोक्त हसुन जगायच
पण, बंद कर तुझ
स्वःता बरसून
लोकांच्या अश्रुत एक व्होवून
वाहून जायचं
बरस तुला जेवढ बरसायच
बरस तुला जेवढ बरसायच...