बोलू लागले थेंब
बोलू लागले थेंब
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
बोलू लागले मेघ कसे टपटप थेंबाची भाषा.
त्या भाषेने पुलकित झाली धरणीची आशा.
सळसळती गाणी सुचली सुकल्या गवताला.
सुटका वारा घालीत पिंगा उडवीत पाचोळा.
झुले सुग्रणीचे घर जणू गीलक्याचा खोसा.
पानपान हे गात गीत का शिरीष पिंपळाचे.
मिटून गेले सूर्यफूल ते लक्ष पाकळ्यांचे.
भरून राहिला आकाशी, सुगंध मातीचा.
ग्रीष्म काहिली विझली आता थेंब मृगाचे आले.
जणू पाहते स्वप्न सुखाचे, सृष्टी मिटूनी डोळे.
आज चांदणे शिंपीत आली आगीवर वर्षा.