STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

बोलकी संत पाठशाळा...

बोलकी संत पाठशाळा...

1 min
12K

तुकडोजी थोर । संत सुधारक ।।

सदा जागरूक । कल्याणास ।। १ ।।


स्वच्छतेचा मंत्र । दिधला जनाला ।।

निर्धार देशाला । ग्रामोन्नती ।। २ ।।


मिटवली कीड । ईश्वर जागर ।।

दगड बेकार ।। अंधश्रद्धा ।। ३ ।।


माणुसकी जप । मिटण्या अज्ञान ।।

आधार विज्ञान । जगण्यास ।। ४ ।।


उपेक्षितांवर । कधी नाही रोष ।।

परंपरा दोष । माथी नाश ।। ५ ।।


अनाथ, अपंग । लोका गोंजारले ।।

आपले मानले । कार्य स्वार्थ ।। ६ ।।


सामाजिक न्याय । झटले अपार ।। 

भाव स्वैराचार । सुधारणा ।। ७ ।।


कीर्तन सागर । मिटे अविचार ।।

चारित्र्य आचार । प्रेरणेचा ।। ८ ।।


शिक्षण गरज । भविष्य संदेश ।।

सार्थ उपदेश । प्रबोधन ।। ९ ।।


महापुरुषाची । देणगी महान ।।

बोलकी तहान । पाठशाळा ।। १० ।।


Rate this content
Log in