बोलकी संस्कारवाडी
बोलकी संस्कारवाडी
सात आठ पोरांना जमवून
बाईंनीचं दामटून बसवायचं
शाळा बिळा कुठली तेव्हा
अंगणवाडी बालवाडी म्हणायचं
आमच्या वेळेस नव्हते बाई
आतासारखे भलेमोठे उपक्रम
साध्या सुध्या अंगणात चाले
जणू रोजचाचं दिनक्रम
पाठीवरती कुठले दप्तर
पिशवीत एक पेन्सिल नि पाटी
त्यावरचं पुन्हापुन्हा गिरवून
व्हायची अक्षरे नि अंकांची दाटी
पाटी गेली नि पेन्सिल ही गेली
फिरवला माझ्या बालवाडीवर बोळा
आज सारं काही मिळून देखील
आजचा बालक मात्र गोळा
नाही दप्तर नाही ओझे
अंगणात होती संस्कारवाडी
होता आठवण बालवाडीची
फुलते मनात पुन्हा सुखवाडी
