STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

बोल कविते माझ्याशी......

बोल कविते माझ्याशी......

1 min
495

बोल कविते माझ्याशी

तुझी ओळख आत्ताची

मनी होते खूप मात्र

आस होती ग कधीची...


माझे शब्द माझ्या ओठी

आले माझ्या मुखातुनी

साज माझ्या कवितांचा

छान आला मुखातुनी...


सल्ला घेतला गुरूंचा

सर्व ऐकले मनाचे

विचारांनी केले काव्य

द्वार खुलले ज्ञानाचे....


लागलेय वेड मला

आता सखे कवितेचे

माझ्या रचना करते

भाव मम अंतरीचे.....


शब्द कधी रूसतात

शब्द कधी हसतात

माझे काव्य करतात

स्वप्नवत भासतात...


कवी मन झाले आता

जाते विसरून दुःख

बोल कविते माझ्याशी

खूप मिळते ग सुख...


साहित्याला गुण द्या
लॉग इन