बंटी
बंटी
नवी- नवी बायको ,करत होती घाई,
दोन वर्ष झाले,किती वाट पाहिल आई.
आता आपल्या घरी आणु चिमुकला बंटी,
दोघांच्या मातोश्री होतील आनंदाने आजी.
बायकोचा विचार एकदम पटला,चला वाढवू खटला,
दोन चार महिण्यात बायकोचा आवाज फाटला.
बंटीच्या पहिले ,बायकोच्या हाती लागली संटी,
थोड्या-थोड्या गोष्टी साठी बायको वाजवते घंटी.
काना-डोळा केलात,दाखवते मोठे –मोठे डोळे व संटी,
बायको ले बजावाच्या पहिले सासूबाई प्रेमाने सांगती.
अशा काळ्यात घरची बाई चिड-चिड नेहमीच करती,
सगळ काही बरे होईल,एकदाचा आला का बंटी.
आत्मसम्मानाच्या गाठोड्याला दाखवली खुंटी,
आत्मसम्मानाच गाठोड आता फ्क्त मोकळ करेल बंटी.
जंगलाच्या राजाचा वाजाला होता बाजा,
बायको आनी सासू घेई जवायाची क्षणा- क्षणाला मजा.
बाप बना साठी किती भोगावी लागते सजा,
कोन म्हनते ,संसाराचा खटला चालवतांनी येते मजा.
बंटीच्या आगमनाने बायकोचे वजन वाढले,
क्षणा-क्षणाले बापाचे वजन व महत्व घटले.
घरचा मुखिया फ्क्त घानीचा बैल असते,
आता ते पटले,जे मित्र सांगत होते.
बंटीच्या नादात कसातरी रमलो,
हे सुखाचे क्षण बायकोले नाही पटले.
बंटीला खेळाला पाहिजे गोडशी बिट्टी,
बायको ले वाजवाची होती माझी शिष्टी.
सुखी कुटुंब म्हणजे बायकोने सांगितले,
आपन दोघे,आपले पाहिजे दोन चिमुकले.
संपूर्ण आदर्श कुटुंबाचा विचार पटला,
बायकोच्या खुशीसाठी वाढवला खटला.
पहिले होतो जंगलाचा जखमी वाघ,
बिट्टीच्या आगमनाने झालो अजगर साप.
