STORYMIRROR

Rajashri Bohara

Others

4  

Rajashri Bohara

Others

बंड

बंड

1 min
294

बास झाली लाचारी आता

शस्त्र उचलणे अनिवार्य आहे

बलात्कारी माजो-यांना

जागेवर ठेचणे न्याय आहे।।धृ।।


अंधारात मेणबत्त्या लावून

नामर्दांच्या डोक्यात 

उजेड पडणार नाही

स्वसंरक्षणाचे धडे गिरवणे

प्रत्येक महिलेला आद्य आहे।।१।।


शिवरायांच्या स्वराज्यात या 

दानवांचे तांडव भयाण झाले

प्रत्येक रणरागिणीला

तलवार उचलणे गरजेचे आहे।।२।।


बांगड्या भरा त्या नराधमांना

ज्यांच्या वासना भागत नाहीत

गाढवावरुन धिंड काढा

नग्न सुळावर खोचून ठेवा।।३।।


माजलेल्या माणुसघाण्यांचे

डोळे शिगेने फोडून टाका

स्त्रीलंपट हरामखोरांची

जीभ घशातून कापून टाका।।४।।


उठा आता सा-यांनी पेटून 

अबलेला आता पेटवू नका

उसळू द्या बंड घराघरातून

अपराध्याला शरण देऊ नका।।५।।


Rate this content
Log in