STORYMIRROR

Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

बळीराजाची धांदल झाली

बळीराजाची धांदल झाली

1 min
171

लहरत विहरत बरसत आला

 दूध भरल्या मेघांच्या धारा

 वनावनातून मोर नाचती

 फुलवुन अपुला छान पिसारा


 दरवळे सुहास मृदू गंधाचा

  आला पाऊस अमृताचा

 पंखावरती थेंब मृगाचा 

 पक्षी विहरती गगनी साचा 


 ढवळ्या पवळ्या ची जोडी

    हुंबरती शेतामध्ये

  भिजुनी चिंब पाखरे

  किलबिलती लपती पानांमध्ये 


 मृगाच्या पावसाने

 जमिनीला वाफ धरली

 पेरणी करण्यासाठी

 बळीराजाची धांदल झाली


Rate this content
Log in